शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

बाळू धानोरकर यांनी केली ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 7:55 PM

ओबीसींची स्वतंत्र जनगणना वगळून सरकारने सातत्याने मागासवर्गीयांना त्यांच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले आहे.

चंद्रपूर : ओबीसींची स्वतंत्र जनगणना वगळून सरकारने सातत्याने मागासवर्गीयांना त्यांच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले आहे. मात्र 2021 मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची मागणी खासदार सुरेश धानोरकर यांनी आज ( 11 डिसेंबर) लोकसभेत केली. याचसोबत अंजली साळवे यांनी सुरू केलेल्या 'पाट्या लावा' मोहिमेला सामान्य नागरिकांकडून मिळत असलेल्या जनगणना २०२१ ला जनतेद्वारे स्वयंस्फूर्त असहभाग प्रतिसादाचा विशेष उल्लेखही खासदार धानोरकर यांनी लोकसभेतील आपल्या प्रश्नात केला. 

ओबीसीची स्वतंत्र जनगणना वगळल्याने उच्च न्यालायत मध्यस्थी अर्ज दाखल करीत जनगणना 2021 ला आव्हान देणा-या व 26 नोव्हेंबर पासून "जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही" अशी पाटी लावा मोहीम राबविणा-या डॉ. ऍड अंजली साळवे विटणकर यांनी ओबीसी संघटनांनी हा विषय संसदेत उचलून धरण्यासंदर्भातील निवेदन त्यांच्या क्षेत्रातील सर्वपक्षिय खासदारांना देण्याची विनंती केली होती. याशिवाय त्यांनी स्वत: याबाबत स्वतंत्रपणे अनेक खासदारांनाही याबाबत विनंती केली होती. याशिवाय यासंदर्भात खासदारांना द्यावयाच्या निवेदनाचा नमुनाही फेसबुक आणि वॉट्सअप सारख्या समाज माध्यमातून सर्व ओबीसी संघटनांना उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ओबीसी संघटनांनी त्यांच्या भागातील खासदारांना हा विषय संसदेत मांडण्याबाबत निवेदन दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी डॉ साळवे यांच्या आवाहनाची दखल घेत यासंबंधी डॉ. साळवे यांचेशी सविस्तर चर्चा करून ओबीसी जनगणनेचा मुद्दा आज (11 डिसेंबर) संसदेत उपस्थित करीत सर्वांचे लक्ष वेधले.

यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक विषय खासदार धानोरकरांनी संसदेत हिरिरीने मांडले आहेत. 2021 मध्ये ओबीसीची स्वतंत्र जणगणना होणे गरजेचे आहे आणि बऱ्याच वर्षांपासून ही जनगणना सरकारद्वारे केल्या जात नसल्याने ओबीसींमध्ये असंतोष आहे, याच मुद्द्याकडे खासदार धानोरकरांनी संसदेचे लक्ष वेधत संविधानाच्या कलम 340, 16(4) तसेच जनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय जनतेची संख्या माहिती करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि इतर माहिती सरकारद्वारे गोळा केली जाते व याच माहितीच्या आधारावर जनतेसाठी शासकीय धोरण व नियोजन केले जाते, परंतु स्वतंत्र जनगणना होत नाही. त्यामुळे सरकार जवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसताना एवढी वर्ष कुठल्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असून हा मागासवर्गीयांना त्यांच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याच्या डॉ. ऍड साळवे व इतर संघटनांच्या या मागणीकडे खासदार धानोरकरांनी संसदेच्या निदर्शनास आणले.तसेच सरकारद्वारे 2021 च्या जनगणने मध्ये भारतीय राज्य घटनेच्या कलम 16(4), 340 व जनगणना कायदा 1948 च्या उद्देशानुसार जाहीर केलेल्या प्रश्नावलीत, जोपर्यंत जातीनिहाय ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी, एसबीसी या मागासवर्गीयांच्या गणनेचा उल्लेख होत नाही तोपर्यंत जनगणना 2021 ला स्थगीत करावे. सोबतच जनगणना 2021 च्या प्रश्नावलीत ओबीसी, व्हीजे, एनटी, डीएनटी, एसबीसी या मागासवर्गाचा स्वतंत्र उल्लेख करून या वर्गाची जातीनिहाय गणना करण्याची मागणीही त्यांनी लोकसभेत केली.

सरकारतर्फे ओबीसी जनगणनेचा विषय अनेक वर्षांपासूण अडगळीत टाकल्या गेल्याने ओबीसीचे आंदोलन सुरू असून विदर्भात डॉ. अंजली साळवे यांच्या "जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही" अश्या पाट्या लावून असहयोग आंदोलन सुरू झाले आहे असा विशेष उल्लेख  खासदार धानोरकरांनी संसदीय प्रश्नात उल्लेख केला,

राज्यात अनेक खासदार असतांना पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार धानोरकरांनी हा विषय मांडून ओबीसीचा आक्रोश संसदेत मांडला व 2021 च्या जनगणनेत ओबीसीची जातनिहाय जनगणनेची मागणी करत जननेता म्हणून पुढाकार घेतल्याने डॉ ऍड अंजली साळवे यांनी त्यांच्यासह सर्व संघटनाचे आभार.- डॉ. ऍड. अंजली साळवे-विटणकर

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती