लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बामणी-नवेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन रविवारी दि. ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी-पॉर्इंट येथे होणार आहे. यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मान देऊन ना. नितीन गडकरी यांनी बामणी-नवेगाव- आष्टी या १६३ कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली. जाहीर सभेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे उपाध्यक्ष मीना चौधरी, पंचायत समिती सभापती गोविंद पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुद्धलवार, अॅड. हरीश गेडाम आदी उपस्थित राहणार आहेत. बामणी-नवेगाव- आष्टी राष्ट्रीय महामार्गामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक व कृषी क्षेत्रात मोठे बदल होणार असून देशभरातील संपर्कासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.
बामणी- आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे उद्या भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 10:36 PM
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बामणी-नवेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन रविवारी दि. ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी-पॉर्इंट येथे होणार आहे. यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्देनितीन गडकरी यांची उपस्थिती