आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बांबूविषयक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक बनतील, असा आशावाद वनसचिव विकास खरगे यांनी व्यक्त केला.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा तिसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवारी लॅमेला हॉल वनप्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा, प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ताडोबा (बफर) प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, कोर प्रकल्पाचे उपसंचालक किशोर मानकर, वनप्रबोधिनीचे अपर संचालक धानके, चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनअधिकारी सोनकुसरे आदी उपस्थित होते.यावेळी व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी यांनी बांबूची शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व दैनंदिन जीवनातील बांबूचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांबू वस्तुच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण व बांबू संशोधन केंद्रात काम करणाºया उत्कृष्ठ कारागीरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बचत गटातील महिलांना बांबू वस्तू तयार करण्यासाठी लागणाºया आवश्यक अवजारांचा संच देण्यात आला. प्रास्ताविकातून बांबू संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी एकंदर आढावा सादर केला. संचालन जी. सी. मेश्राम तर आभार आर.टी.धोडरे यांनी मानले.२०० महिलांनी घेतले प्रशिक्षणबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध बांबू वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण चंद्रपूर व विसापूर येथील बचत गटातील महिलांना देण्यात येत आहे. आतापर्यंत १४ बचत गटातील २०० महिलांना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात हिरवई धनलक्ष्मी महिला बचतगट, आफिया महिला बचतगट, शारदा महिला बचतगट, सहेली महिला बचतगट, उज्वल महिला बचतगट, समूह महिला बचतगट व उन्नती महिला बचतगट अशा अनेक महिला बचतगटांचा समावेश आहे.
बांबू अभ्यासक्रमातील विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:16 AM
बांबूविषयक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक बनतील, असा आशावाद वनसचिव विकास खरगे यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देविकास खरगे : प्रशिक्षण केंद्राचा तिसरा वर्धापन दिन