सिंदेवाही : बामसेफ सिंदेवाही जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सिंदेवाहीतील विविध शासकीय-निमशासकीय विभागातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिकारी, तसेच तालुक्यातील राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी, विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बामसेफचे पदाधिकारी डाॅ.प्रेमकुमार खोब्रागडे, शीलपाल ताम्बागडे, डाॅ.विनोद नागदेवते, शैलेंद्र खंडालें, प्रा.राजेश डहारे व बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे सचिन शेंडे उपस्थित होते.
याप्रसंगी सत्कारमूर्ती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सर्वश्री तालुका कृषी अधिकारी पी.एम. खेडकर, प्रा.जे. टी. मेश्राम, कृषी विस्तार अधिकारी रमेश डोंगरे व वनकर्मचारी संतोष पोपटे व मागासवर्गीय हायस्कूल वासेराचे मुख्याध्यापक रतन चहान्दे यांचा आयोजकांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी दिनेश शेंडे यांना कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डाॅ.विनोद नागदेवते व बहुजन समाज पार्टीचे नंदू खोब्रागडे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तालुकास्तरीय विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी प्राची दीपक मोटघरे व श्रेयस विष्णू घुबे यांना रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.भारत मेश्राम, आभार नंदू खोब्रागडे यांनी मानले.