मूल : बचत गटातील महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी चंद्रपूर मध्यवर्ती बँक नेहमीच बचत गटांना कर्ज वितरित करीत आहे. बचत गटातील महिला-पुरुषांनी रोजगार करावे, यासाठी बचत गटांना कर्जपुरवठा केला जात असून बँक सदैव बचत गटाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. शाखा मूलच्या वतीने तालुक्यातील बचत गटांना कर्जवाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार, बँकेचे वरिष्ठ अधिकारी नंदुजी मडावी, बँकेचे शाखा व्यवस्थापक वाळके, वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्धर आजार असलेल्या अनेक शेतकऱ्यांना रोगनिदान करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून ४० हजारापर्यंतचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, संचालन बचत गटाचे संयोजक अशोक पवार यांनी केले. आभार बँकेचे वरिष्ठ अधिकारी नंदू मडावी यांनी मानले.