लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील बरांज तांडा या परिसरात हातभट्टीवर दारू काढत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर भद्रावती पोलीस व दारूबंदी पथक चंद्रपूर यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान करण्यात आली. मात्र पोलिसांना पाहताच आरोपी पसार झालेबरांज तांडा येथील झुडपी जंगलाच्या परिसरात मागील अनेक दिवसांपासून हातभट्टीवर मोठ्या प्रमाणात दारू काढल्या जाते. भद्रावती पोलीस व चंद्रपूर पोलीस यांनी संयुक्तपणे मोहिम राबवीत धाड टाकली. दरम्यान घटनास्थळावरुन ९ प्लॉस्टीक ड्रम, एक स्टील गुंड, ९२० गुड सडवा, ५५ लीटर गुड दारू असा एकूण दोन लाख ३० हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यातील सुरेश भूक्या, मानसींग बानोत हे दोन्ही आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बि.डी. मडावी, सहाय्यक पोलीस निर्देशक आळंदे, महेंद्र इंगळे, राजेश वºहाडे, चिटघरे, पावडे, वागदरकर, पोउनि सरकाटे यांनी केली.
बरांज तांडा येथील हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:18 PM
तालुक्यातील बरांज तांडा या परिसरात हातभट्टीवर दारू काढत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली.
ठळक मुद्देसंयुक्त कारवाई : अडीच लाखांचा दारूसाठा जप्त