आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्यालय सुरू केले. या कार्यालयातून भाविकांना आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत सेवा व दुकानदारांना जागा वाटप करणे आदी सेवा पुरविण्यात येत आहेत.महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पालिकेचे गटनेते वसंत देशमुख, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, महाकाली प्रभागाचे नगरसेवक नंदू नागरकर आशा आबोजवार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महापौर घोटेकर यांचे हस्ते माता महाकालीच्या प्रतिमेची पूजन करून कार्यालयाचे फीत कापण्यात आले. पालिकेतर्फे भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांबाबत महापौर घोटेकर यांनी यांनी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाप्रसंगी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, प्रमुख वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, नामदेव राऊत, रवी हजारे, विवेक पोतनुरवार, भुपेश गोठे, उदय मैलारपवार यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रास्ताविक व संचालन विवेक पोतनुरवार यांनी केले. आभार धनंजय सरनाईक यांनी मानले. नगरसेवक नागरकर यांनी महाकली मातेच्या इतिहासावर प्रकाश टाकला. चंद्रपुरात राज्यभरातून भाविक येतात. त्यांना योग्य सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत. शहरातील नागरिकांनीही पालिकेला सहकार्य करून धार्मिक कार्याची प्रतिष्ठा कायम राखावी. यावेळी सतिश घोनमोडे, कल्पना लहामगे, शितल कुळमेथे गायत्री सरनाई तर नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, पोलीस विभागातर्फे सहा. पोलीस निरीक्षक ठाकूर व प्रमोद चिंचोळकर, मनपा कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी १०८ अॅम्बुलन्सवरील डॉक्टर व नागरिक उपस्थित होते. सर्वांना मिठाई व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महाकाली भाविकांसाठी मनपाकडून मूलभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:08 PM
आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्यालय सुरू केले.
ठळक मुद्देमहाकाली यात्रेला प्रारंभ : देवस्थान परिसरात यात्रा कार्यालय सुरू