लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने आणखी एक आर्थिक धक्का दिला आहे. मार्च महिना संपला तरीही फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) जिल्हा शाखा चंद्रपूरने याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना दिले. यावेळी शिष्टमंडळात विलास बोबडे, अमोल देठे, नरेंद्र चौखे, अजय बेदरे, सतीश दुवावार यांचा समावेश होता. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचे मासिक वेतन नियमितपणे वेळेवर होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जानेवारी महिन्याचे मासिक वेतन उशीरा मिळाले तर मार्च महिना संपला तरी फेब्रुवारीचे वेतन मिळाले नाही. मग पुढील मासिक वेतनाचा नियमितपणा होऊ शकणार नाही.शासनाच्या शालार्थ आॅनलाईन वेतन प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे जानेवारी २०१८ चे वेतन आॅफलाईन पद्धतीने अदा करण्यास २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१८ पर्यंतचे मासिक वेतन आॅफलाईन पद्धतीने वितरित करण्याबाबत शासनाने २३ फेब्रुवारीला शासन आदेश काढले आहे. मात्र अद्यापही फेब्रुवारीचे वेतन झालेले नाही.वेतन रखडल्याने आर्थिक भुर्दंडएक तारखेला वेतन देण्याचा शासनाचा नियम असून राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याबाबत सतत आग्रही आहेत. शासनाने वेळोवेळी अनेक आदेश काढलेत. परंतु मासिक वेतन आॅनलाईन पद्धतीने असो की आॅफलाईन एक तारखेला वेतन अदा होत नसल्याने शिक्षकांच्या कर्जाचे हफ्ते थकीत होत असतात. त्यावर विनाकारण व्याजाचा भूर्दंड पडत असल्याने शिक्षक अडचणीत येत आहेत.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:36 PM
अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने आणखी एक आर्थिक धक्का दिला आहे. मार्च महिना संपला तरीही फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत.
ठळक मुद्देशिक्षकांमध्ये रोष : शालार्थ वेतन प्रणालीचा खोडा