शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

विदर्भाच्या मागणीसाठी आता आरपारची लढाई

By admin | Published: November 11, 2016 1:02 AM

विदर्भामध्ये वनसंपदा , खनिज , विज , पाणी मुबलक प्रमाणात असून विदर्भ राज्य झाल्यास हे संपन्न राज्य होऊन विदर्भवासीयांचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे .

वामनराव चटप : आंदोलनाने पेटविणार मागणीचिमूर : विदर्भामध्ये वनसंपदा , खनिज , विज , पाणी मुबलक प्रमाणात असून विदर्भ राज्य झाल्यास हे संपन्न राज्य होऊन विदर्भवासीयांचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे . विदर्भ राज्याची ११३ वषार्पांसून मागणी असून राज्य व केंद्र सरकार शेकडो वर्षांपासून गांभिर्याने विचार करून राज्याच्या मागणीला बगल देत आहेत, त्यामुळे आता राज्यासाठी जनता आरपारची लढाई करणार असल्याची माहिती चिमूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख समन्वयक अँड . वामनराव चटप यांनी दिली .विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ५ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून विदर्भभर वातावरण निर्मिती केली जात आहे त्याकरिता गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. अँड . चटप यांनी सांगितले की , विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या चारवर्षांपासून आंदोलने झालीत. मात्र केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. प्रधानमंत्री व गृहमंत्र्यांनी भेटीकरिता वेळही दिला नाही. लेखी निवेदने, पत्र आदींची दखल न घेऊन भाजपाच्या केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रती सवेदना नसल्याचे दिसून येते .अँड. चटप यांनी सांगितले की वैदर्भाय जनतेला दिलेले विदभार्चे आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता दिलेले आश्वासन, शेतकरी आत्महत्या यावर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. विदर्भ राज्य करू, अशी हाकाटी पिटणारे भाजपाचे मोठे नेते मौनीबाबा झालेले आहेत. म्हणूनच या सर्व प्रश्नांकरिता मोर्चा व ठिय्या आंदोलन असून १ जानेवारीपासून ‘विदर्भ मिळवू औंदा’, या घोषणेप्रमाणे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.५ डिसेंबरच्या आंदोलनाकरिता विदर्भाच्या पाच सीमा भागातून पाच विदर्भ दिंडीयात्रा निघणार असून ५ डिसेंबरला नागपूरला दुपारी १२ वाजता पाच मार्गांनी पोहचतील. दुपारी १ वाजता विधान भवनावर मोर्चा निघेल. पहिली दिंडी सिंदखेडराजा (बुलढाणा) वरून, दुसरी उमरखेडवरून, तिसरी देवरी (गोंदिया), चौथी दिंडी शेंडगाव (गाडगेबाबांचे जन्मगाव), पाचवी दिंडी कालेश्वर (गडचिरोली) येथून निघणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभे, किशोर पोतनवार, आपच्या महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे , अँड . हिराचंद बोरकुटे , सचिव नागपूर विभाग मितीन भागवत , प्रा. डॉ . सोपान चिकटे, चिमूर तालुका अध्यक्ष नरेंद्र बंडे, उपाध्यक्ष प्रा. संजय पिठाळे उपस्थीत होते. (तालुका प्रतिनिधी)