लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ हा समाजापुढील गहन प्रश्न झाला आहे. याबाबतची वास्तविकता व जागरुकता शालेय स्तरावरून मुलांमध्ये रुजविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी पार पडली.यावेळी ते बोलत होते.समाज जोपर्यंत प्रशासनाचे नाक, कान, डोळे होत नाही. तोपर्यंत असामाजिक तत्त्वाद्वारे समाज विघातक कार्यवाही कमी होणार नाही. दुधामध्ये भेसळ, अन्नधान्यमधली भेसळ, मिठाई, खाद्यान्न यामध्ये भेसळ करणारे आपली मुले देखील या भेसळीचे शिकार होऊ शकतात, हे विसरतात. त्यामुळे अशा पद्धतीच्या गैरकृत्याबाबत शैक्षणिक स्तरावरच प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जनजागृती करेल, अशा पद्धतीची चित्रफीत बनवावी, अशी सूचना देखील त्यांनी केली. पोलीस प्रशासनाने यामध्ये अन्न व औषधी विभागाची मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात जिल्ह्यामध्ये सण-उत्सवाचे पर्व सुरू होत असून या काळात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीबाबत प्रयत्न केले जातात. याबाबत जागरूकतेने काम करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागाचे सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी जिल्हास्तरावर भेसळ ओळखणाऱ्या प्रयोगशाळेच्या गठनाबाबत प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या भेसळीबाबतही अनेक तक्रारी आल्या असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अन्न व औषधी प्रशासनामार्फत सन २०१८-२०१९ मध्ये ६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आली होती. त्यातील गुटखा व पानमसालाच्या संदर्भात दहा नमुने असुरक्षित आढळून आले असल्याने कारवाई करण्याचे सांगितले. या बैठकीला सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन नि.दी मोहिते, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी ज्ञानेश ढोके, दूध संघाचे अध्यक्ष मु.जे.बगमाटे, अन्नसुरक्षा अधिकारी प्र. अ. उमप, जी. टी.सातकर उपस्थित होते.नागरिकांनी तक्रार करावीअन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न पदार्थामध्ये भेसळ आाढळल्यास सामान्य नागरिकांनी टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन किंवा स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात सुचना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
अन्न भेसळीबाबत जागरूक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:36 AM
जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ हा समाजापुढील गहन प्रश्न झाला आहे. याबाबतची वास्तविकता व जागरुकता शालेय स्तरावरून मुलांमध्ये रुजविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी पार पडली.यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देकुणाल खेमनार : अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा घेतला आढावा