जिल्ह्यात बाधित आढळलेल्या २३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६, बल्लारपूर २, मूल ४, राजुरा १, चिमूर १, वरोरा ४, कोरपना २ आणि जिवती तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही. २४ तासात जिल्ह्यात २६ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ७३० वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २ झाली आहे. सध्या १९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ६६ हजार ८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ७८ हजार ८४१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १५३२ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासन अलर्ट
कोरोना साखळी तोडण्यात यश आल्याने राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले होते. दरम्यान, राज्यात कोरोना डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याच्या धास्तीने पुन्हा काही निर्बंध लागू झाले. जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे निर्बंध लादण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात होता. आता कोरोना रुग्ण वाढू लागल्याने नागरिक चिंतीत असून जिल्हा प्रशासनही अलर्ट झाले आहे.
कोट
नागरिकांनी कोरोना संसर्गमुक्त राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. कोरोना अद्याप संपला नाही, याचे भान ठेवूनच दैनंदिन खबरदारी पाळावी. तातडीने प्रतिबंधात्मक लस घ्यावी.
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर