शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:34 AM

सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असा सल्ला बल्लारपूरचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक नवनीतकुमार कावत यांनी केला.

ठळक मुद्देनवनीतकुमार कावत : रमजान व बुद्ध जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असा सल्ला बल्लारपूरचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक नवनीतकुमार कावत यांनी केला.रमजान महिना व बुद्ध जयंतीनिमित्त बल्लारपूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची सभा झाली. त्यात सायबर गुन्ह्यांची माहिती देताना ते बोलत होते. परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक कावत म्हणाले, व्हॉटस्अ‍ॅप येणारा कोणताही संदेश वाचल्यानंतर तो लगेच फॉरवर्ड करू नये. धार्मिक भावना दुखावणारे संदेश तर मुळीच पाठवू नये. तसे संदेश आल्यास पोलिसांना कळवावे, असेही त्यांनी सभेत सांगितले. शांतता कमिटीच्या सदस्यांनी काही सूचना मांडल्या. या सूचनांची पोलीस प्रशासनाने नोंद घेतली. न. प. सभापती विनोद यादव, माजी नगर सेवक राजू दारी, वसंत खेडेकर, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, न.प.चे माजी उपाध्यक्ष संपत कोरडे, शेख उस्मान, जावेद खान, शेख बब्बू, रवी मातंगी, विश्वास देशभ्रतार, विनोद स्वामी, आर.एन. अडूरवार आदी उपस्थित होते. संचालन सुभाष शिडाम यांनी मानले.