शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

कुष्ठरोगींच्या आनंदासह दु:खातही सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:31 PM

‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत.

ठळक मुद्देविकास आमटे : समाजदिन म्हणून कर्मयोगी बाबा आमटे जयंती साजरी

आॅनलाईन लोकमतवरोरा: ‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत. अनेक व्यक्ती कुष्ठरोगाच्या आनंदात सहभागी होतात तसेच दु:खतही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आनंदवनात आयोजित समाज दिन कार्यक्रमात मंगळवारी केले.कर्मयोगी बाबा आमटे यांचा जन्म दिन समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंदवनात अनाम वृक्षांची स्मरणशीला आणि अनाम मूक कळ्यांचीस्मरण शिला तसेच कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या समाधीला मान्यवरांच्या हस्तेपुष्पचक्र अर्पण करुन कर्मयोगी बाबा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आनंदवन निर्मित स्वरानंद आर्केष्ट्राच्या चमूने बाबांची गीते सादर करुन बाबांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संचिताचे कवडसे या लेख मालिकेतील डॉ. विकास आमटे यांच्या लेखाचे आणि कर्मयोगी बाबा आमटेच्या कवितांचे वाचन करण्यात आले. यावेळी निलकृष्ण देशपांडे लिखित महामानव गीत वंदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, गुलानी, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, गौतम करजगी, पल्लवी आमटे, सोमनाथ रोडे, प्रा. श्रीकांत पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शेखर नाईक, माधव कविश्वर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, जोडो भारत अभियानात सहभागी मंडळी, आनंदवन मित्र मंडळ वरोरा, आनंदवनातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगरीवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘जोडो भारत’ या गिताने झाली.