शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

अस्वलाचा चंद्रपूर शहरात तब्बल सात तास मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 7:47 PM

चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देवनविभागाने बेशुद्ध करून केले जेरबंद तात्पूरते उपचार केंद्रामध्ये हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. प्राथमिक तपासणी करून या अस्वलाला येथीलच तात्पूरते उपचार केंद्रामध्ये उपचारार्थ ठेवण्यात आले आहे.पहाटे सुमारे २ वाजता एक अस्वल चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रेल्वे रुळाच्या मार्गाने चंद्रपूरातील संजय गांधी मार्केट परिसरात दाखल झाली. यानंतर ती जटपुरा गेटपर्यंत गेली. तेथून परतीचा मार्ग तिला गवसलाच नसल्याने तिची भटकंती सुरू झाली. येथून बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बंगाली कॉलनी परिसर, तेथून इंडस्ट्रीयल इस्टेट मार्गे आदर्श पेट्रोल पंप लगतच्या महावितरण सेंटर परिसरात गेली. नंतर शास्त्रीनगर मार्गे बंगाली कॅम्प परिसर, राधिका सभागृह असा प्रवास करीत असतानाच दिवस उजाळला. मात्र तीला तिचा मार्ग सापडला नाही. अखेर ती सीएचएल हॉस्पिटल लगतच्या बाजुला असलेल्या झुडुपात लपून बसली. दरम्यान, रॅपिड रिस्पॉन्स युनिटसह वनविभागाचे विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे, सहाय्यक वनसंरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, इको-प्रोचे वन्यजीव संरक्षक दल, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, मिलिंद किटे व वनकर्मचारी ही मंडळी तिच्या मागावर होती. झुडुपात अस्वल दडून बसल्यामुळे मोठ्या शिताफीने तिला शुटर बेग यांनी बेशुद्ध करण्यात यश मिळविले. जरबंद करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडशेलवार यांनी तपासणी केल्यानंतर या अस्वलाला तात्पूरते उपचार केंद्रामध्ये हलविण्यात आले.वीज केंद्र परिसरातील अस्वलही अस्वल वीज केंद्र परिसरात अनेक झाडे-झुडपे असून ताडोबाचा परिसरात जवळच आहे. या भागात अनेकदा वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे. हे प्राणी वीज केंद्रातून येणाऱ्या रेल्वे रुळाच्या मार्गे चंद्रपूर शहरात येतात. यानंतर या प्राण्यांना परतीचा मार्गच गवसत नसल्यामुळे त्यांची भटकंती होते. यापर्वीही अनेकदा चंद्रपूरात अस्वलाचे दर्शन झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय गांधी मार्केट परिसरात असेच एक अस्वल आले होते. नंतर नागरिकांनी त्याला हुसकावले असता ते इरईनदीच्या दिशेने पळून गेले होते.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव