लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिचे मातीचे ढिगारे नदी नाल्यांच्या अगदी किनाºयावर टाकले आहे. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे. पावसाच्या दिवसात मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा गोवरी, सास्ती, बल्लारपूर या परिसरातील गावांना ब्लॉक वाटरचा फटका बसलेला असून, पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेकोलिने मातीचे ढिगारे हटवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बीआरएसपीने दिला होता. मात्र मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शनिवारी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात वेकोलिच्या व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला.मागील आठवड्यात आलेल्या एका दिवसाच्या पावसाने मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. वेकोलिने नैसर्गिक जिवंत नाले आपल्या सोयीनुसार वळविल्याने पावसाचे पाणी गोवरी, सास्ती पोवनी गावाच्या दिशेने लवकर फेकले जाते. परिणामी या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते. शेतीचे प्रचंड नुकसान होते व बल्लारपूर शहराला पण त्याचा परिणाम पोहचतो. त्यामुळे वेकोलि प्रशासनाने मातीचे ढिगारे हटविण्याची प्रक्रिया करावी, अशा प्रकारचे निवेदन बीआरएसपीच्या पदाधिकाºयांनी वेकोलि व्यवस्थापकांना दिले होते. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेकोलिच्या अधिकाºयांना घेराव घातला. यानंतरही वेकोलिने याकडे लक्ष देऊ न मातीचे ढिगारे हटविले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बीआरएसपी विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी दिला आहे.आंदोलनात अनिश मानकर, संघपाल देठे, संपत कोरडे, जयवंत जीवने, आकाश नळे, आॅलियन सावरकर, साहिल झाडे, बबलू करमनकर, शैलेश बारसागडे, आस्टिन सावरकर, प्रशांत वाघमारे, श्रीकांत नळे, सुनिल नळे, राजकिरण पिपरे, प्रशांत वाटेकर, मारोती माऊलीकर, स्वप्नील आदींचा सहभाग होता.
वेकोलि व्यवस्थापकाला बीआरएसपीचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:19 PM
तालुक्यातील बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिचे मातीचे ढिगारे नदी नाल्यांच्या अगदी किनाºयावर टाकले आहे. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला आहे.
ठळक मुद्देमातीचे ढिगारे हटविण्याची मागणी : तीव्र आंदोलनाचा इशारा