चंद्रपूर : शहरातील शेवटाच्या भागांचा विकास झाला नाही. या दुर्लक्षित भागांकडे लक्ष केंद्रीत करुन सर्वसमावेशक विकास करण्याचा माझा मानस आहे. जगन्नाथ बाबा मठ माना टेकडी येथील सौदर्यीकरणाच्या जगन्नाथ बाबा मठ माना टेकडी येथील सौदर्यीकरणाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. जिल्हा खनीज प्रतिष्ठाण, चंद्रपूर प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याणयोजने अंतर्गत सौदर्यीकरण कामाच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बाेलत होते.
यावेळी वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, सहसंचालक खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेचे विश्वजीत शाहा, सलामी शेख, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कूळमेथे, राहूल मोहुर्ले, दुर्गा वैरागडे, विलास वनकर, विलास सोमलवार, राशिद हुसेन, करणसिंह बैस, आशा देशमुख, वैशाली मेश्राम, विमल काटकर, सविता दंडारे, भाग्यश्री हांडे, जगन्नाथ बाबा मठाच्या विश्वस्थांची उपस्थिती होती. सुमारे ३ कोटी खर्च करुन सौदर्यीकरणाच्या माध्यमातून या भागाचा चेहरामोहरा बदलविण्यात येणार आहे.
बाबूपेठ येथील टाॅवर टेकडी, संजय नगर, क्रिष्णा नगर, माना टेकडी हे सर्व परिसर चंद्रपूरच्या शेवटच्या टोकास बसले आहे. त्यामूळे या भागांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. मात्र आता हि परिस्थिती बदलणार आहे. १७ लाख खर्च करुन क्रिष्णा नगर येथे कॉंक्रीट रोडचे काम सुरु करण्यात आले . टाॅवर टेकडी भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे याकरीता टाकी लावण्यात आली आहे. या भागातील अनेक कामे प्रस्तावीत असून येत्या काळात पूर्ण होणार आहे, अशी माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली.