राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील बसस्थानकाजवळील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने ४९८.९७ लाखांचा निधी ंमंजूर केला. त्यामुळे तलाव बळकटीकरणासोबतच विविध कामे केली जाणार असून तलावाचे रूपडे बदलणार आहे. या निर्णयामुळे जलसाठाही कायम राहणार आहे. शिवाय, मासेमारी करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या मूल बसस्थानकाजवळील माजी माल गुजारी तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव सन २०१३-१४ या वर्षात तयार करण्यात आला होता. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी जलसंपदा विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता आर. आर. सोनोने यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करून मूल येथील जनता दरबारात यासंदर्भात चित्रफितद्वारे माहिती सादर केली होती. तलावात पाणी येण्यासाठी करवन येथील नाल्याचा प्रवाह ४.५० किमी लांबीच्या फीडर कॅनलद्वारे या तलावाशी जोडण्यात आला आहे. तलावाचा अंदाजित सर्वसाधारण येवा १.३४ दलघमी इतका असून तलाव दरवर्षी पूर्ण क्षमतेपर्यंत भरलेला असतो. या तलावाच्या धरणपाळीची एकूण लांबी १२१७ मीटर व महत्तम उंची ४.२६ मीटर आहे. तलावाची एकूण साठवण क्षमता ४५३ दलघमी असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा ०.४३२ दलघमी इतका आहे. तलावातील पाणी साठ्याची महत्तम उंची २.४४ मीटर इतकी आहे.खरीप हंगामात या तलावाची सिंचन क्षमता १९२ हेक्टर इतकी असून एवढे क्षेत्र सिंचीत करण्यासाठी तलावातील जवळपास संपूर्ण जलसाठा वापरण्यात येतो. त्यामुळे खरीप हंगामानंतर तलावात केवळ पाण्याचा मृतसाठा शिल्लक उरतो. तीन वर्षांपूर्वी तलावाचे खोलीकरण यांत्रिकी विभागाद्वारे करण्यात आले.त्यामुळे तलावाच्या साठ्यात आणखी वाढ झाली आहे. त्यानुसार हंगामानंतरही दीड ते दोन फुट खोलीचे पाणी बुडीत क्षेत्रात पाळी लगतच्या भागात शिल्लक राहते. तलावाच्या खोलीकरणाअंतर्गत २६.२१ हेक्टर बुडीत क्षेत्रातील निम्नस्तर पातळीच्या वरचे जवळपास ६ हेक्टर क्षेत्र सरासरी १.०० मीटर खोल खोदणे प्रस्तावित आहे. त्यामुळे ३० घमी इतके खोदकाम होणार आहे. १.८४ हेक्टरचे क्षेत्रात जेवढे पाणी साठत होते.त्यापेक्षाही जास्त उपयुक्त जलसाठा निर्माण होणार आहे. त्यामुळे या परिसरात उद्यान तयार करण्याकरिता सदर क्षेत्र बुजविल्या गेले तरी तलावातील पाणी साठा कमी होणार नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. सिंचन, मासेमारी आणि सौंदर्यीकरण या तिन्ही घटकांचा विचार करून पाटबंधारे विभागाकडून तलावाचा विकास होणार असल्याने शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.विकासाला मिळणार चालनातलावात नौका विहाराची सुविधा, उद्यानाची निर्मिती, मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी बोटींग फ्लॅटफार्म, उद्यानाला सुरक्षा भिंत व चेकलिंक तारेचे कुंपन, नविन रस्ते, उद्यानात कांरजे, मुलांसाठी बालोद्यान, प्रसाधनगृह, विद्युतीकरण, पाणी पुरवठा आदींची सुविधा केली जाणार आहे. तसेच नवीन रस्त्यावर वृक्षारोपण होणार असून धरणाच्या पाळीवर व नवीन रस्त्याच्या बाजूला विद्युत पथदिव्यांची उभारणी केली जाणार आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे नागरिकांना फिरण्यासाठी, अप्रतीम स्थळ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळण्यासोबतच मासेमारी व्यवसायाला हातभार लागणार आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे मूल शहराला नवी दिशा मिळणार आहे. संबंधित कंत्राटदाराने नुकतीच जागेची पाहणी केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने शहर विकासाला चालना मिळणार आहे.मूल येथील मामा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही दिवसातच सुरू होणार आहे. हे काम नागपुरातील एका कंपनीला देण्यात आले. संबंधित यंत्रणेने जागेची नुकतीच पाहणी केली असून येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे.- एस.बी. सोनेकरशाखा अभियंता,जलसंपदा विभाग, मूल
मूल येथील तलावाचे होणार सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:11 PM
येथील बसस्थानकाजवळील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने ४९८.९७ लाखांचा निधी ंमंजूर केला. त्यामुळे तलाव बळकटीकरणासोबतच विविध कामे केली जाणार असून तलावाचे रूपडे बदलणार आहे. या निर्णयामुळे जलसाठाही कायम राहणार आहे. शिवाय, मासेमारी करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
ठळक मुद्दे४९८.९६ लाख रुपये मंजूर : कंत्राटदाराने केली जागेची पाहणी