आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सामान्य रुग्णालयातील १३७ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात ३ जानेवारीपासून स्थानिक जटपुरा गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे. शनिवारी या उपोषणाचा सहावा दिवस होता. शनिवारी या कंत्राटी कामगारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर झाडू मोर्चा काढून आम्ही भीक मागायची की दारू विकायची, अशा संतप्त घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान सर्व कामगारांनी उपोषण मंडपात एकत्रित येऊन झाडू मोर्चाची सुरूवात केली. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक १३७ कामगारांना कामावरून काढून टाकले. यामुळे त्यांच्यावर अचानक बेरोजगारी ओढवली. कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे आता आम्ही करायचे काय, असा संतप्त सवाल कामगारांनी यावेळी केला. मोर्चादरम्यान, आम्एी भिक मागायची की अवैध दारू विकायची, अशा प्रश्नांकित घोषणाही देण्यात येत होत्या. जटपुरा गेट येथून दवा बाजार मार्गे हे सर्व कामगार मेडीकल कॉलेजमध्ये धडकले. यावेळी मेडीकल कॉलेजच्या मुख्य गेटवर कामगारांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना न जुमानता मोर्चेकरी आत शिरले. त्यानंतर महाविद्यालयाचे डीन डॉ. मोरे यांच्या कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी डीन डॉ. मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी डॉ. मोरे यांना बेरोजगार व गोरगरीब कामगारांची दखल घ्यावी, अन्यथा ८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला.
भीक मागायची की दारू विकायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:18 AM
सामान्य रुग्णालयातील १३७ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात ३ जानेवारीपासून स्थानिक जटपुरा गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे.
ठळक मुद्देसंतप्त सवाल : कंत्राटी कामगारांचा झाडू मोर्चा