आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोध दर्शवत भद्रावती तालुक्यातील बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आमच्या गावची शाळा बंद करू नका, अन्यथा एकाही विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेत १ ते चवथीपर्यंत दहा विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र कमी पटसंख्येमुळे ही शाळा बंद करण्यात आली असून येथील विद्यार्थ्यांचे अडीच ते तीन किमी अंतरावरील जेना येथील जिल्हा परिषद शाळेत समायोजन करण्यात आले आहे. लहान बालकांना अडीच ते तीन किमी अंतर जावून शिक्षण घेणे अवघड असल्याने गावची शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीची आहे.जिल्हा परिषदेवर धडक दिली तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हजर नव्हते. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी कृषी सभापती अर्चना जिवतोडे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कायरकर, प्रतीभा पंडीले, पोलीस पाटील उषा पंडीले, प्रशांत मत्ते, गुणवंत मत्ते, वर्षा पंडीले, विकास पंडीले, स्वप्नील पंडीले, रेखा मत्ते, कल्पना आस्कर, विद्यार्थिंनी श्रावणी कायरकर, ममता कायरकर, वैष्णवी मत्ते आदी उपस्थित होते.
बेल्लोराच्या नागरिकांची जिल्हा परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:37 PM
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोध दर्शवत भद्रावती तालुक्यातील बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आमच्या गावची शाळा बंद करू नका, अन्यथा एकाही विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.बेल्लोरा ...
ठळक मुद्देशाळा बंद करू नका : विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा