शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, आदी पिकांच्या अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून, १५ मे पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
असा करा अर्ज
महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा, वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.