---
बाजापेठ सजली
चंद्रपूर : कोरोनाचे सावट दूर सारून ख्रिसमसनिमीत्त बाजारपेठ सजली आहे. येथील बाजारात विविवध साहित्यही विक्रीसाठी आले आहे. त्यामुळे सध्या बाजारात गर्दी वाढत असून व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
----
बुध्दगुडा रस्त्याची दुरुस्ती करावी
जिवती : तालुक्यातील बुध्दगुडा तसेच परिसरातील काही गावामध्ये समस्या आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील समस्या सोडवाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
--
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. अशावेळी वाहनाचे अपघातही घडत आहेत. त्यामुळे घराबाहेर निघणे कठीण झाले. नगरपरिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
रस्त्यांवरील झुडपे ठरत आहेत जीवघेणे
ब्रह्मपुरी : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र दुर्लतक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कर्ज मिळत नसल्याने निराशा
स : तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योगांचा अभाव आहे. बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.