लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य सेवा तत्काळ गरजु जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता शासन नेहमी प्रयत्नरत राहिले आहे. शासनाने असंसर्गजन्य आजार नियंत्रणाकरिता एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जनतेला तत्काळ लाभ मिळू शकणार आहे.मधुमेह, ह्रदयरोग, कर्करोग, पक्षाघात, मानसिक आजार अशा विविध आजाराचे निदान व उपचार याकरीता जिल्हयात आरोग्य कर्मचारी यांच्याद्वारे माहिती गोळा करुन आॅनलाईन डाटा अपडेट करुन गरजेनुसार तात्काळ उपचार व नियंत्रणाकरिता एनसीडी, आयटी सॉफ्टवेअर कार्यान्वित केलेले आहे. सदर प्रशिक्षणात जिल्हयातील सर्व उपकेंद्राचे एएनएम यांना डॉटा अपडेट करण्याकरिता टॅबचे वाटप करण्यात येत आहे. याकरिता वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, डॉटा एन्टी आॅपरेटर, ब्लॉक कम्युनिटी फॅसिलीटर यांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे एनसीडी कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत आशा वर्करपासून ते शासनस्तरापर्यंत पर्याप्त अचुक डाटा पोहचविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर दोन दिवसीय एनसीडी, आयटी साप्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी ॉ.सुधीर मेश्राम, कैलास कराडे, डॉ.श्वेता सावलीकर उपस्थित होते. सदर एनसीडी, आयटी साफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळेत राज्यस्तरीय प्रशिक्षक कैलास कराडे यांनी माहिती दिली.
रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:09 AM
जिल्ह्यातील आरोग्य सेवा तत्काळ गरजु जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता शासन नेहमी प्रयत्नरत राहिले आहे. शासनाने असंसर्गजन्य आजार नियंत्रणाकरिता एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जनतेला तत्काळ लाभ मिळू शकणार आहे.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण : एनसीडी, आयटी सॉफ्टवेअर कार्यान्वित