शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2017 12:39 AM

पंचायत समिती भद्रावतीची वार्षिक आमसभा नगर परिषद भद्रावती सभागृहा नुकतीच पार पडली.

धानोरकरांनी अधिकाऱ्यांना खडसावले : पं.स. वार्षिक आमसभालोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : पंचायत समिती भद्रावतीची वार्षिक आमसभा नगर परिषद भद्रावती सभागृहा नुकतीच पार पडली. या आमसभेच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर उपस्थित होते. तसेच तहसिलदार सचिन कुमावत, संविअ एस.तुपे, सहायक सं.वि.अ. संदीप गोडशेलवार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पं.स. उपसभापती नागो बहादे, कृउबास सभापती वासुदेव ठाकरे उपस्थित होते.जनसामान्यानी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करीत असताना उपस्थित अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराज होत आ. बाळू धानोरकरांनी काही विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत गेल्याच पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते प्रसार माध्यम राबवा अन्यथा याला अधिकारी वर्ग जबाबदार असेल असा दमच आ. धानोरकरांनी दिला. वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्रात दोन दिवस जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शोषखड्डे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम ठरेल असेही ते याप्रसंगी म्हणाले.मुख्यमंत्री पांदण रस्ता योजनेप्रमाणे आमदार पांदण रस्ता योजना राबवावी अशी मागणी याप्रसंगी माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केली. हा अभिनव उपक्रम असल्याचे आ. धानोरकर म्हणाले. तालुक्यातील कचराळा ते निखंजा पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत करण्याची मागणी भास्कर ताजणे यांनी केली. आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभाग लघु सिंचाई, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. पशु संवर्धन विभाग कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, पंचायत विभाग, मागास क्षेत्र अनुदान निधी सायकल, शिलाई मशीन पानी पुरवठ्याच्या प्रश्नावर साधकबाधक चर्चा झाली.