लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला. बहुप्रतीक्षेनंतर आलेल्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले.मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा पावसाच्या बाबतीत दुर्दैवीच ठरत आला आहे. उन्हाळा नेहमीच त्रस्त करून सोडतो. मात्र पाऊस पाहिजे तसा बरसत नाही. यावर्षीच्या उन्हाळ्याने तर कहरच केला. मार्च महिन्यापासून जूनच्या पंधरवाड्यापर्यंत सूर्याने अविरत आग ओकली. सूर्याचा पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. दुपारी रस्ते ओस पडू लागले होते. जूनच्या पंधरवाड्यापर्यंतही पाऊस पडला नाही. मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकºयांसह जिल्ह्यातील नागरिकही चिंतातूर झाले होते.मागील वर्षीचा हंगाम शेतकºयांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकºयांच्या हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाने देऊ केलेली कर्जमाफी अद्याप अनेकांना मिळालेली नाही. आता पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. बँकेचे कर्ज, उसनवारी घेऊन शेतकºयांनी बि-बियाणे, खते खरेदी केले. मात्र दमदार पाऊस झाला नाही. यंदाही पाऊस हिरमोड करेल, असे वाटत असतानाच २० जून रोजी पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस पाहिजे तसा दमदार नव्हता. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. पाऊस तर आला नाहीच, उलट तापमान पुन्हा वाढू लागले. पारा पुन्हा ४१, ४२ अंशावर गेला. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असतानाच शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर ढग जाऊन कडक उन्ह निघाले. दरम्यान, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वातावरण बदलले.चहुबाजूंनी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. एक तास चांगला पाऊस बरसला. विशेष म्हणजे, काही भागाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस बरसला. त्यामुळे पाणी जमिनीत मुरले. या पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंद पसरला.दुबार पेरणी टळलीयापूर्वी झालेल्या एका पावसानंतर अनेक शेतकºयांनी पेरणी केली होती. हवामान खात्यानेही २० जूननंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र पाऊस आलाच नाही. पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर झाले. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र आज शुक्रवारी जिल्हाभर झालेल्या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे.पावसाने सातत्य ठेवले तर पेरण्यांना येईल वेगशुक्रवारचा पाऊस दमदार स्वरुपाचा व सर्वत्र होता. त्यामुळे जमिनीमध्ये बºयापैकी पाणी मुरले आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी अशाच पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांनी पेरणी थांबवून ठेवली होती. मात्र आज झालेल्या पावसामुळे शनिवारी अनेक शेतकरी पेरणीला कामाला लागतील. पावसाने असेच सातत्य ठेवले तर पुढच्या काही दिवसात पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात दमदार बसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:44 PM
एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला. बहुप्रतीक्षेनंतर आलेल्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये आनंद : पावसाच्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले