जिल्ह्यात मान्सून दाखल होताच शेतकरी कामाला लागला. दरम्यान, कृषी केंद्रांमध्ये खते-बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी सुरू केली. कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक किंवा लुबाडणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जिल्ह्याभरात १६ भरारी पथके गठित केली आहेत. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना बिल मिळते की नाही, शासनाने ठरवून दिलेल्या दराने खतांची किंवा बियाणांची विक्री केली जाते की नाही, ई-पास मशीनचा वापर केला जातो की नाही, खताची गुणवत्ता व दर्जा याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.
बॉक्स
७० लाखांचे बोगस बियाणे जप्त
हंगामाला सुरुवात होताच अनेक जण बोगस बियाणांची विक्री सुरू करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक तयार केले. जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही पथे काम करीत आहेत. यंदाच्या हंगामात या पथकांनी ७० लाखांचे बोगस बियाणे जप्त केले आहे.
कोट
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यात १६ पथके गठित केली आहेत. कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास या पथकातर्फे त्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात येते. आजपर्यंत या पथकांनी ७० लाखांचे बोगस बियाणे जप्त केले आहेत.
-भाऊसाहेब बऱ्हाटे,
जिल्हा कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक, चंद्रपूर