आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारिप बहुजन महासंघ, जिल्हा कृती समिती व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.संत गाडगे महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर खुशाल तेलंग, प्रा. एस. टी. चिकटे, बंडू नगराळे, अंकुश वाघमारे, एस. डी. सातकर, जि. के. उपरे, हिराचंद बोरकुटे, नामदेव कन्नाके आदींनी मार्गदर्शन केले.मागील दोन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकीत आहे. ती शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी, पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाने मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी, अनुसूचित जाती-जमातीचा निधी इतरत्र वळता केला जाणार नाही, यासाठी तेलंगाणा, आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे कायदा करावा, आदी मागण्यांचे निवेदन भारत थुलकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेऊन मागण्या त्वरीत सोडविण्यात याव्या, अन्यथा भारिप बहुजन महासंघ व आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात एस. डी. सातकर, सेवचंद नागदेवते, सत्यभामा भाले, जास्वंदी माऊलीकर, रमेश वर्धे, राजेराम पुल्लोरी, बंडू नगराळे तसेच भारिपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नारनवरे, संचालन प्रदिप झाडे व आभार संतोष डांगे यांनी मानले.
भारिप बहुजन महासंघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:42 PM
भारिप बहुजन महासंघ, जिल्हा कृती समिती व महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. व्ही. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्याची मागणी