आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १ जानेवारीला कोरेगाव (भीमा) येथे घडलेल्या दंगलीप्रकरणी संपूर्ण राज्यभरात शेकडो दलित युवक व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्यावे आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.कोरेगाव(भीमा) येथे घडलेल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी ३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी, दंगलीमध्ये ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची वाहने जाळण्यात आली. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरीत, द्यावी, आदी मागण्यांना घेऊन सदर आंदोलन पार पडले. आंदोलनानंतर सभा घेण्यात आली. यावेळी भारिप बहुजन महासंघचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, शहराध्यक्ष राजू कीर्तक, जिल्हा महासचिव धीरज बांबोडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश ढेंगरे, सुमित मेश्राम, धीरज तेलंग, लता साव, निशा ढेंगरे, कल्पना अलोणे, सुभाष थोरात, डी. एस. वानखेडे, रामजी जुनघरे, नितेश तुरीले, नाजिम शेख, अक्षय वाघवीसे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. सरकारने न्याय दिला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.शहर महासचिव रूपचंद निमगडे यांनी संचालन केले. कृष्णा पेरकावार यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातून भारिप महासंघचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोंभुर्ण्यात तहसीलदारांना निवेदनप्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पोंभुणा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात एन.डी.थेरकर, शाम गेडाम, चंद्रदास उराडे, रंजीत खोब्रागडे, वनश्री गेडाम, सुशीला उराडे आदी उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:08 PM
१ जानेवारीला कोरेगाव (भीमा) येथे घडलेल्या दंगलीप्रकरणी संपूर्ण राज्यभरात शेकडो दलित युवक व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : एकबोटे व भिडेंवर कारवाईची मागणी