शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

जागा नसतानाही तलावाचे भूमिपूजन

By admin | Published: January 03, 2015 11:00 PM

साखरवाही येथील तलाव बांधकामासाठी जागा उपलब्ध नसतानासुद्धा दोन कोटी ८२ लाखांच्या कामाचे भूमिपूजन लघुसिंचन अधिकाऱ्यांनी उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राजुरा : साखरवाही येथील तलाव बांधकामासाठी जागा उपलब्ध नसतानासुद्धा दोन कोटी ८२ लाखांच्या कामाचे भूमिपूजन लघुसिंचन अधिकाऱ्यांनी उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील लघुसिंचन विभागाच्या वतीने साखरवाही, सुमठाणा, बोडखा शेतशिवारात लघुपाटबंधारे तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे १६० हेक्टर शेतजमीन ओलित होणार आहे. साखरवाही व बोडखा या शिवारातील १८ शेतकऱ्यांच्या २९ हेक्टर शेतजमिनी अधिगृहित होणार आहेत. यासाठी मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. सध्या या जमिनीवर पिके उभे असून जोपर्यंत कोरडवाहू शेतीला १० लाख व ओलित शेतीला १२ लाख रुपये भाव मिळणार नाही, तोपर्यंत जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. कल्याणकारी व लोकउपयोगी प्रकल्प तत्कालिन आमदार सुभाष धोटे यांनी कार्यान्वित केला होता. या प्रकल्पात बोेडखा येथील दहा, साखरवाही येथील आठ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहित होणार आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. उद्देश चांगला असला तरी शासनाकडे सध्या या प्रकल्पासाठी जागा नाही. असे असतानाही १२ आॅगस्ट २०१४ ला या तलाव प्रकल्पाचे थाटात भूमिपूजन करण्यात आले. कार्यालयीन फाईलीमुळे अजूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. या तलावासाठी आनंद पडवेकर, तुकाराम आसूटकर, प्रभाकर चोथले, प्रभाकर लोहे, किसन आसूटकर, देविदास वांढरे, जगन्नाथ वांढरे, पुरुषोत्तम आसूटकर, नागु डवरे, जनार्दन मत्ते, विजय झाडे, सावत्राबाई आगलावे मनोज आगलावे, किसन आसूटकर, नानाजी चौथले, शंकर आसूटकर या १८ शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)