लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी कौतुक केले.यावेळी समितीच्या अन्य आमदार सदस्यांनी या मुलांची मुलाखत घेत एव्हरेस्टच्या आठवणींना जागृती दिली. जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन चंद्रपूर जिल्हयात तसेच महाराष्ट्रासह देशात आपले नाव लौकीक केले आहे. अशा या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा विधानसभा सदस्य डॉ. अशोक उईके व समितीचे सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार राजा वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे व कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांनी चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली भेट आदिवासी विक्रमविरांची घेतली. समितीच्या सदस्यांनी यावेळी या मुलांना अनेक प्रश्न विचारले. या मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार उच्चपदस्थ नोकºया मिळाव्यात. चांगल्या ठिकाणी त्यांना समाजाचे नेतृत्व करता यावे, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी समितीचे सदस्य आमदार वैभव पिचड यांनी केले. तर अन्य सदस्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. चंद्रपूर ते एव्हरेस्ट हा प्रवास करतांना आलेल्या अडचणी, शासनाकडून झालेली मदत याबद्दलही समिती सदस्यांनी माहिती घेतली. या मुलांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.यावेळी समितीच्या सदस्यांनी कवीदास काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, विकास सोयाम, आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम राज्याला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:20 AM
जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, .....
ठळक मुद्देअशोक उईके : अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव