ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार : लवकरच आझाद बगीचा होणार विकसित चंद्रपूर: चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्याच्या विकासकामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार होत्या. प्रथम ज्येष्ठ नागरिक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, गणपतराव अमृतकर, विठ्ठलराव घटे, विजय चंदावार, शफीक अहमद, डॉ. गोपाल मुंधडा, राजेंद्र खजांची, आशा ठाकरे, शोभा कच्छवा, मृणालिनी खोब्रागडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, सभागृह नेता रितेश तिवारी, महिला व बालकल्याण सभापती एस्तेर शिरवार व उपसभापती योगिता मडावी, गटनेता अनिल फुलझेले, झोन सभापती देवानंद वाढई, मेहर सिडाम, मनोरंजन रॉय यांच्यासह माजी महापौर व नगरसेविका संगीता अमृतकर, माजी उपमहापौर तथा गटनेता संदीप आवारी, नगरसेवक रवी गुरनले, अजय खंडेलवार, विनय जोगेकर, बंडू हजारे, राजेश अड्डूर, राजकुमार उके, माजी झोन सभापती अनिता कथडे, सुनिता अग्रवाल, एकता गुरले उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आझाद बगिचाबाबत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नागरिकांची सोयीसाठी स्वच्छतागृह, बेंचेस, नागरिकांना विचार मांडण्याकरिता ओटा तसेच योग व व्यायाम याकरिता शेडचे बांधकाम करावे, अशी आशा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. पुरातनकालीन बगीचा हा नागरिकांचा आत्मा आहे. त्याचे सौंदर्यीकरण व्हावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनी लवकरच नागरिकांसाठी सर्व सोई-सुविधायुक्त आझाद बगीचा कार्यान्वित होईल, याची शाश्वती दिली. (शहर प्रतिनिधी)
आझाद बागेच्या विकासकामांचे भूमिपूजन
By admin | Published: July 29, 2016 1:01 AM