लोकमत न्यूज नेटवर्कसावली : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारपायली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे बिबट मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना दर्शन देत आहे. मात्र या शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने बिबट केव्हाही शिरकाव करु शकतो. तरीसुद्धा बिबट्याच्या दहशतीमध्ये जि. प. शाळेचे व अंगणवाडीचे विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे.भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ६०० च्या जवळपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदचे शाळेचे २४ व एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या मागच्या परिसरात दाट वृक्षे आहेत. गाव जंगल लगत क्षेत्रात असल्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात राहतो. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची दहशत आहे. २२ आॅगस्ट रोजी येथील जि. प. शाळेच्या मागच्या भागात बिबट्याने किशोर दडिकवार यांच्या म्हशीच्या वासराला ठार केले होते. त्यानंतर अनेकदा गावाशेजारी बिबट्याने दर्शन दिले आहे. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. या शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने बिबट केव्हाशी शाळेत सहज प्रवेश करु शकतो. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.शाळेच्या परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. शाळेच्या मागे बिबट्याने जनावरला ठार केले होते. यावरुन बिबट केव्हाही शाळा परिसरात दखल होण्याची संभावणा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने बिबट्याला शाळा परिसरात येण सहज शक्य आहे. त्यामुळे सुरक्षा भिंत बांधावी.- श्रीकांत बहिरवार,ग्रा. पं. सदस्य चारगाव
बिबटाच्या दहशतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:25 AM
भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ६०० च्या जवळपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदचे शाळेचे २४ व एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या मागच्या परिसरात दाट वृक्षे आहेत.
ठळक मुद्देपालकांमध्ये भीती : वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी