मान्यवरांचा सूर : कामाच्या ठिकाणी ‘लैंगिक छळ संरक्षण अधिनियमा’वर कार्यशाळाचिमूर : अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. महिला या स्वत:ला दुर्बल समजतात, अन्याय, अत्याचार सहन करतात म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो. या अन्यायाला वाचा फोडा, बोला, अन्याय, अत्याचाराचा प्रतिकार करा, सहन करू नका डॉ.बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले आहे, त्याचा उपयोग करा, असे आवाहन प्रा. पिठाडे यांनी केले.आठवले समाजकार्य महाविद्यालयात २७ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार ‘कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ संरक्षण अधिनियम २०१३’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून अॅड. सातारडे होते. त्यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संरक्षणअधिनियम २०१३ यात समाविष्ठ बाबींवर प्रकाश टाकला तर लैंगीक छळ कशाला म्हणायचे, त्यातील प्रावधान शिक्षा, विशाखा समिती या विषयावर मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर होत्या. त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तक्रारी असल्यास समितीकडे तक्रार बिनधास्त करा, घाबरू नका, अन्याय अत्याचार सहन करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आयोजन प्रा.विणा काकडे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार ज्योत्सना शिंगणजुडे यांनी मानले. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार
By admin | Published: March 06, 2017 12:33 AM