लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभीडअंतर्गत दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या कारवायातील ७६ लाखांच्या दारुसाठ्यातील मुख्य दारुतस्कराला अटक केली. श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा असे मुख्य तस्कराचे नाव असून तो दारुबंदीनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुपुरवठा करीत असल्याची माहिती आहे.स्थानक गुन्हे शाखेचे पोलीस मागील काही महिन्यांपासून श्रीनिवास कोलावारच्या मागावर होते. काही दिवसांपूर्वी नागभीड पोलीस ठाणे हद्दीत ५५९ पेट्या दारुसाठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात श्रीनिवास कोलावारवर गुन्हा दाखल होता. मात्र, श्रीनिवास कोलावार फरार होता. दरम्यान, २५ आॅगस्ट रोजी श्रीनिवास कोलावार पवनीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी श्रीनिवासला जेरबंद केले.श्रीनिवास कोलावार हा स्वत:च्या भट्टीत दारु तयार करीत होता. त्याच्याकडे दारुविक्रीचे दोन परवाने असून, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर या परिसरात दारुचा पुरवठा करीत होता. या परिसरातील दारुविक्रेत्यांचा श्रीनिवास हा मुख्य पुरवठादार होतो. अनेक दारुच्या कारवायात श्रीनिवासवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र, त्याला अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलसांना श्रीनिवास कोलावारला करण्यात यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे प्रभारी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, संगीडवार, अविनाश दाशमवार, अमजद, संदीप मुळे, मयूर येरमे यांच्या पथकाने केली.सणासुदीच्या दिवसांमध्ये दारुची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. ही बाब लक्षात घेता दारुतस्करांनी दारुची तस्करी करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढविल्या असून, लगतच्या यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तस्करीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पेलिसांकडून होत असलेल्या कारवाईवरुन दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसांनीही दारू तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.हॉटेलवर पोलिसांची धाडचंद्रपूर: येथील मोतीमहल हॉटेलवर पोलिसांनी धाड घालून हॉटेलचालकासह सहा जणांना अटक केली. शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामुळे हॉटेलचालकांमध्ये एकच खळबळ उडली आहे. भावेश मनसुखलाल सावलिया, अधीर अरुण मंडल, अजय गोविंदराज, राजेश जलधर सरकार, गोपाळ लक्ष्मण खवस, गुरुप्रितसिंग अरविंद सिंगडोत अशी अटकेतील व्यक्तीची नावे आहेत. दारुबंदीनंतर जिल्ह्यातील काही हॉटेल्स आणि ढाब्यावर ग्राहकांना दारु पुरविली जात असल्याची माहिती आहे. येथील मोतीमहल हॉटेलमध्ये ग्राहकांना दारुापुरवठा केला जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या मार्गदर्शनात रामनगर ठाणे अंतर्गत बंगाली कॅम्प चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामटेके, डीबीपथकाचे दरेकर, कापडे, निलेश मुडे यांच्या पथकाने रात्री १२.३० वाजता हॉटेलमध्ये धाड घातली. यावेळी काही ग्राहक टेबलवर दारु पिताना रंगेहात आढळून आले. पोलिसांनी हॉटेल चालकासह सहा जणांना अटक केली. या सर्वांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी लोहारा येथील एका ढाब्यावर पोलिसांनी धाड घालून शासकीय कर्मचाऱ्यांना अटक केली होती. दारुबंदीनंतर बार कुलूप बंद झाले. मात्र, यानंतर काही हॉटेल्स आणि ढाब्यांना बारचे रुप आले आहे. मात्र तीन वर्षात कोणत्याच हॉटेल्स आणि ढाब्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधिक्षकपदाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा चार्ज झाली असून, हॉटेल ढाब्यावर कारवाईची मोहिम हाती घेतल्याने हॉटेलचाकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बड्या दारू तस्कराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:22 PM
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभीडअंतर्गत दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या कारवायातील ७६ लाखांच्या दारुसाठ्यातील मुख्य दारुतस्कराला अटक केली. श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा असे मुख्य तस्कराचे नाव असून तो दारुबंदीनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुपुरवठा करीत असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देपोलीस आक्रमक : दोन वेगवेगळ्या कारवायात ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त