आदिलाबाद-गडचांदूर राष्ट्रीय महामार्ग बंद : सुदैवाने जीवितहानी टळली
शैलेश लोखंडे
गडचांदूर : सततच्या पावसाने व वादळी वाऱ्याने आदिलाबाद - गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळ वृक्ष थेट ट्रकच्या समोरील भागावर कोसळल्याने वाहतूक चार तास बंद पडली होती. गडचांदूरवरून दोन किमी अंतरावर असलेल्या बालाजी सेलिब्रेशनजवळ शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
गडचांदूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे वृक्ष असून, सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी रात्री वादळी पाऊस झाला. शनिवारी सकाळीही पाऊस होता. यादरम्यान एक मोठा वृक्ष राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकवर कोसळला. यामुळे चार तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
वृक्ष मोठा असल्याने संपूर्ण रस्त्यावर वृक्षाच्या फांद्या पसरलेल्या होत्या. गडचांदूर पोलिसांना कळताच बचाव पथकाने अथक परिश्रमाने जेसीबी व कटरच्या साहाय्याने वृक्ष बाजूला करून सकाळी १० वाजता रस्ता खुला करण्यात आला. यावेळी पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चार मोठे सिमेंट कारखाने असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेकांच्या कामांचा खोळंबा झाला.
कोट
आम्हाला माहिती मिळताच मी स्वतः माझा कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलो व जेसीबी, कटर मशीनच्या साहाय्याने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
-सत्यजित आमले,
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, गडचांदूर
110921\img-20210911-wa0085.jpg~110921\img-20210911-wa0083.jpg
ट्रक वर कोसळलेले झाड~वाहतूक बंद झाल्याने जमा झालेले नागरिक