शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक डोंगरगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:50 PM

बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे.

ठळक मुद्देअमित भगत यांचा दावा : चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासावर नवा प्रकाश

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे. शिवाय, अशा प्रकारचे सुमारे ३० स्मारक या परिसरात आहेत, असा दावा युवा अभ्यासक अमित भगत यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना केला. भगत हे मुंबई येथील रहिवासी असून चंद्रपुरातील एका विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.एकाश्म स्मारकांची मौलिकता स्पष्ट करताना अमित भगत म्हणाले, डोंगरगाव येथील एकाश्म स्मारक शिळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या बृदहाश्मयुगीन, महापाषणयुगीन संस्कृतीचा पुरावा आहे. नागभीड शहराच्या वायव्येस साधारणत: साडेचार किमी अंतरावरील जंगलात १० ते १२ शिलास्तंभ आढळले आहेत. भारतातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने दक्षिण भारतातच आढळले आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील आढळलेली स्मारके महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात दिसून आली नाहीत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बृहदाश्यमयुगीन संस्कृतीला समांतर अशी प्रगत नागरी संस्कृती नांदत होती, असा दावाही त्यांनी केला. या स्मारकांवर सखोल अभ्यास करून पुराव्यासह संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रकाशित करू, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात बृहदाश्मयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारे एकाश्म स्मारक अद्याप आढळले नाही. या स्मारकांचा सखोल अभ्यास सुरू केला असून, चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन तेजस्वी इतिहास पुढे मांडणार आहे.- अमित भगत, युवा अभ्यासक