मागे असलेले वाहन दिसण्यासाठी तसेच समाेरून वाहनाला ओव्हरटेक करताने वाहने दिसावे यासाठी दुचाकीला दोन्ही बाजूने आरसे दिलेले आहे. मात्र अनेक युवकांकडून दुचाकीचे आरसे काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्या जात आहे. मागील काही दिवसांमध्ये शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. रस्ता अरुंद आणि दुचाकीसंख्या अधिक त्यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याचिच आहे. असे असतानाही काही तरुण आपले वाहन दमडट आहे. यामध्ये अपघाताची शक्यता आहे. दरम्यान, परिवहन विभाग तसेच वाहतूक पोलिसांना आरसे नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई कऱण्याचा अधिकार आहे. मात्र बहुतांश वेळा आरसे नसलेल्या वाहन धारकांना कारवाई होताना दिसत नाही.
बाॅक्स
३०० रुपयांच्या दंडाची तरतूद
दुचाकी चालकांजवळ परवाना नसल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच दुचाकीला आरसे नसल्यास २०० ते ३०० रुपयांपर्यंत दंड आकारता येते. मात्र बहुतांश वेळा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
-
दुचाकी चालकांना हे आहे बंधनकारक
दुचाकी चालवितांना हेल्मेट, दुचाकीवर आरसा तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्र, प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र अनेक जण दुचीकीचालक कागदपत्र न ठेवता वेळ मारून नेत आहे.
----
हृदयनाश यादव
वाहतूक निरीक्षक
चंद्रपूर