शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

सुरक्षेवर कोट्यवधी खर्च; धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:33 PM

वेकोलिने प्रकल्पग्रस्त आणि खाणीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्येही असंतोष आहे.

ठळक मुद्देवेकोलिच्या सर्व खाणींमधून केवळ उत्पादनावरच भरसुरक्षात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा; हजारो कामगारांचा जीव धोक्यात

राजेश रेवते।आॅनलाईन लोकमतमाजरी : वेकोलिने प्रकल्पग्रस्त आणि खाणीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्येही असंतोष आहे. माजरी क्षेत्रातील काही खाणी बंद झाल्यामुळे कामगारांचे स्थानांतरण करण्यात आले. सुरक्षा व कामगार कायद्यानुसार मागण्यांचा आग्रह धरल्यास कामावरून काढण्याची भीती आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगार मानसिक दबावात आहेत. आजही हा प्रकार बंद झाला नाही. सुरक्षेसाठी वेकोलिकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. मात्र, अपघातांचा धोका कायम असल्याने ही रक्कम नेमकी जाते कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.माजरी येथील जुना कुनाडा खाणीत धनसार इंजिनिअरिंग कंपनीने उत्खनन सुरू केले. या कंपनीकडे ६०० कामगार काम करतात. सुरक्षेच्या कारणावरून खाण बंद केल्यास कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून कोळसा खाण सुरू ठेवल्यास कामगारांचे हित आहे. पण वेकोलि प्रशासनाने केवळ उत्पादनावर डोळा ठेवून सुरक्षा यंत्रणेत सुधारणा केली नाही. त्याचा फटका कामगारांना बसु लागला आहे. तेलवासा खुल्या खाणीत ढिगारा कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाला. जुना कुनाडा खाणीत सहा कामगार जखमी झाले. या घटनेत सुरक्षितेतील त्रुटी पुढे आल्या पण, त्या दुरूस्ती करण्यासंदर्भात पाऊले उचलण्याची शक्यता कमीच दिसते. कोळसा खाणीत शंभर टक्के दुरूस्त वाहनांचा वापर केला जात नाही. यातूनही अनेक अपघात होत आहेत. मातीचे ढिगारे उपसल्यानंतर ते किती उंचीवर ठेवावे याचेही नियम आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे परिसरातील शेतीमालाची उत्पादकता घटण्याची उदाहरणे पुढे येत आहे. माजरी, शिवाजीनगर, पाटाळा, नागलोन, पळसगाव येथील काही शेतकºयांच्या जमिनी हस्तांतरीत केल्या. नियमानुसार मोबदला आणि काहींना नोकºया देवू असे आश्वासन वेकोलिने दिले होते. दरम्यान, आंदोलनाची भूमिका घेतल्याने काहींना नोकºया मिळाल्या. परंतु अनेकजण वंचित असल्याचे दिसून येते. वेकोलि माजरी क्षेत्रात पाच कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या हितासाठी वेकलि व्यवस्थापनाविरूद्ध संघर्षाची भूमिका घेणे गरजेचे आहे. अंतर्गत सुधारणा करण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव राहिल्यास परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हक्क तुडविण्याची हिंमत वेकोलिचे संबंधित अधिकारी करणार नाहीत.