लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकऱ्यांनी केली आहे.चिचाळा शास्त्री येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून हरिदास सुखदेवे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. बांधकामासाठी रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी काढली नाही, असा आरोप उपसरपंच राऊत यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत बंधाºयाचे काम करणाऱ्याला कंत्राटदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम दिला जात असल्याचेही गावकºयांनी तक्रारीत म्हटले आहे.बांधकाम करताना सदर कामाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले नाही. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर संबंधित माहितीचा फलक लावला नाही. बंधाºयाचे बांधकाम सुरू असताना जि. प. शाखा अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही, असा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.बांधकामाची चौकशी करावीशासनाने 'पाणी अडवा- पाणी जिरवा' या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु कंत्राटदार व अभियंताच्या संगनमताने बांधकाम निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. परिणामी, शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे. चिचाळा शास्त्री या गावातही हाच प्रकार घडत असल्याने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत, ग्रा. पं. सदस्य हरिदास सुखदेवे, जीवन रंदई, रंजू दडमल आदींनी संबंधित अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा पीक वाया जाणारचिमूर तालुक्यात सिंचनाचे प्रमाण आधीच कमी आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक पीक घेतात. शासनाने विविध योजनांद्वारे सिंचन योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, काही अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे असे प्रकल्प बिनकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला. अशा घटनांमुळे यंदाही पिकांचे नुकसान होऊ शकते.
चिचाळा येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी बिनकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:23 AM
येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर सुरू असल्याचा आरोप