कोरपना : तालुक्यातील जेवरा परिसरातील वनजमिनीवर जैवविविधता पार्क उभारण्यात यावा, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.
कोरपनापासून जेवरा येथील पैनगंगा नदीतीरापर्यंत विस्तीर्ण वन विभागाची जमीन आहे. मात्र, हा भाग वृक्षाअभावी ओसाड पडलेला आहे. त्यामुळे या वनक्षेत्रावर विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात यावी. जेणेकरून हा भाग पुनश्च हिरवागार होईल. या ठिकाणी जैवविविधता पार्क उभारल्यास वृक्ष संवर्धनासोबत वनपर्यटन केंद्र म्हणून हा परिसर विकसित होईल. त्यामुळे या भागाला नवी ओळख प्राप्त होऊन रोजगाराला चालना मिळेल. तसेच वनविभागाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. या दृष्टीने
वनविभागाने याकडे लक्ष देऊन जैवविविधता पार्कची त्वरित निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
कोरपना येथे वनविद्या महाविद्यालय सुरू करा
कोरपना शहराला लागून असलेल्या जेवरा वनक्षेत्रात वन विभागाची दीडशे ते दोनशे एकर वन जमीन उपलब्ध आहे. सध्या ती ओसाड अवस्थेत आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यासाठी वनविद्या महाविद्यालय व जैवविविधता पार्क उभारण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.