चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदार संघात प्रचाराने वेग धरला आहे. कुठे भाजप, कुठे काँग्रेस तर कुठे अपक्ष मुसंडी मारत आहे. या प्रचारयुद्धात मतदानापर्यंत कोण तग धरतो यावर बरेच गणित अवलंबून आहे.
वंचित बहुजन आघाडी व आप लढत असले तरी उमेदवार काय चमत्कार करतो, याकडेही जनतेचे लक्ष लागून आहेत.राज्याचे लक्ष लागून असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर मतदार संघात विरोधकांना अद्यापही मोट बांधता आलेली नाही. काँग्रेसने अंतर्गत विरोध पत्करून डॉ. विश्वास झाडे यांच्यावर बाजी लावली. वंचित बहुजन आघाडीने राजू झोडे यांना मैदानात उतरवून चुरस निर्माण केली असली तरी एकाही उमेदवाराची तुलना मुनगंटीवारांशी होताना दिसत नाही. राजकीय स्थिती बघता मुनगंटीवार यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना विरोधकांकडे उत्तर नाही. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातून प्राबल्य असतानाही भाजपने माघार घेत ही जागा शिवसेनेला दिली.
शिवसेनेकडे कार्यकर्तेच नसल्याने नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांना शिवबंधन बांधून मैदानात उतरविले. निवडणुकीपुरतेच या क्षेत्राशी नाते असलेल्या गड्डमवारांपुढे कडवे आव्हान आहे. चिमूरात भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया व काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर यांच्यात लढत आहे. भांगडिया हे पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर मते मागत आहे. ही बाब काँग्रेससाठी अडचणीची ठरत आहेत.राजुरा मतदार संघातभाजपचे अॅड. संजय धोटे, काँग्रेसचे सुभाष धोटे व स्वभापचे अॅड. वामनराव चटप यांच्यात लढत असली तरी गोंडवाना गणतंत्र पाटीचे उमेदवार गोदरू जुमनाके यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीही असल्याने निवडणुकीची चुरस चांगलीचवाढली आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) भाजपकडून चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांत झालेली विकासकामे.२) महाआघाडीकडून शेतकरीव बेरोजगार, गरीब व कष्टकऱ्यांचे प्रश्न.३) बेरोजगारी, बंद पडलेले उद्योग, वाढती महागाई हे कळीचे मुद्दे आहेत.४) वीज केंद्र असतानाही चंद्रपूर जिल्ह्याला महागडी वीज हाही महत्त्वाचा मुद्दा.रंगतदार लढतीचंद्रपूर मतदार संघात काँग्रेसने पक्षप्रवेश केल्यानंतरही किशोर जोरगेवार यांना उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचा मतदार वर्ग चांगलाचा दुखावला आहे. जोरगेवारांनी जनतेची मते जाणून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. त्यांचा वाढता जनाधार काँग्रेससह भाजपसाठी डोकेदुखी ठरला आहे.सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील सर्वात अभ्यासू व उच्चशिक्षितमंत्री आहे. त्यांची विकासकामांकडे बघण्याची दूरदृष्टी एकाही उमेदवाराकडे दिसत नसल्याने लढत एकतर्फी होईल, असे अपवादात्मक चित्र बल्लारपूर मतदार संघात आहे.वरोरा मतदार संघात काँग्रेसने खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिली. शिवसेनेने केवळ आमदार व मंत्रीपदाच्या अनुभवावर संजय देवतळे यांच्यावर बाजी लावली. मनसेने एक पाऊल पुढे टाकत रमेश राजुरकर हा प्रतिष्ठित चेहरा रिंगणात उतरविला. यामुळे तिंरगी लढत रंगतदार होणार आहे.