शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

नागभीड बाजार समितीत भाजपाचे वर्चस्व

By admin | Published: March 07, 2017 12:39 AM

नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत.

काँग्रेस तीन तर अपक्ष एक : १८ पैकी भाजपाचे १५ संचालक विजयीनागभीड : नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत. या बाजार समितीची रविवारी निवडणूक घेण्यात आली आणि आज सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय असे की या बाजार समितीवर भाजपाचे ६ संचालक आधिच अविरोध निवडून आले होते.सोसायटी गटाच्या सर्व साधारण प्रवर्गातून आधिच अविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अवेश खाँ पठाण, गणेश तर्वेकर, नागो खोकले, मनोहर चौधरी, आनंद कोरे, विलास मोहुर्ले (सर्व भाजप) आणि जनार्दन खंडाळे (काँग्रेस) यांचा समावेश आहे. सेवा सहकारी गटातील महिला प्रवर्गातून रागिणी दिगंबर पाटील गुरुपुडे, शशिकला श्रीराम माटे, या गटाच्या इतर मागास वर्गीय प्रवर्गातून रमेश गणपत बोरकर तर विमाप्र प्रवर्गातून चंद्रशेखर श्रीधर विगम निवडून आले आहेत.ग्रामपंचायत गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गातून भैय्या रघुनाथ गिरडकर आणि अजय दयाराम देवाडे विजयी झाले आहेत. या गटाच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राहुल सदाशिव रामटेके तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून दीपक पुनाजी भेंडारे निवडून आले. अडते व्यापारी मतदार संघातून विजय तुळशिराम येरणे आणि मुर्लीधर वारलू श्रीरसागर यांचा विजय झाला आहे. हमाल मापारी मतदार संघातून धनराज गोविंदा ढोक यांचा विजय झाला. ही मतमोजणी येथील राजीव गांधी सभागृहात करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ब्रह्मपुरीचे सहायक निबंधक सुभाष फुटाने यांनी काम पाहिले. अनिल उपासे, एस. डी. मेश्राम आणि एस. बी. सहारे यांनी त्यांना सहकार्य केले. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)तब्बल आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या बाजार समितीची निवडणूक झाल्याने सर्वाचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले होते. प्रारंभी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचा गट काँग्रेससोबत बसेल, अशी चर्चा रंगली होती. पण नामांकन परत घेण्याच्या दिवशीपर्यंत चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया व गजानन पाथोडे यांच्यात मनोमिलन झाल्याने या निवडणुकीने भाजपच्या बाजूनेच वळण घेतले होते. एवढेच नाही तर भाजप समर्थित पॅनलचा विजय पक्का मानला जात होता.