सुभाष धोटे यांचा आरोप : भारोसा येथे शेतकरी मेळावाबाखर्डी : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून मागील दोन वर्षाच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कधी निसर्गाने शेतकरी मरतो. तर शासनाकडून शेतीमालाला भाव नाही, वीज नाही, कर्जमाफी नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आत्महत्यापूरक वातावरण सरकारनेच तयार केले आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी केला.भारोसा येथे शनिवारी आयोजित शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरपना तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, कोरपना पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, चं.जि.म.बँकेचे संचालक विजय बावणे, नवनिर्वाचित जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, विना मालेकर, कल्पना पेचे, नवनिर्वाचित पं.स. सदस्य रुपाली तोडसे, डॉ.ठाकरे दिनकर मालेकर, राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, प्रा. उमेश राजुरकर, देवराव ठावरी, योगेश गोखरे, सरपंचा सिमा भगत, दीपक पानघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोरपना पंचायत समितीचे सभापती श्याम रणदिवे, निर्वाचित जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, विना मालेकर, कल्पना पेचे, नवनिर्वाचित पं.स.सदस्य रुपाली तोडसे यांचा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल थिपे म्हणाले की, भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कापूस,सोयाबीन, धान, तुळ, चना आदी शेतपिकांना मागीलवर्षी इतकाही भाव मिळालेला नाही. किमान आधारभूत किंमती प्रमाणे दर देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.असे ते म्हणाले. मनोज ढोलणे यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकऱ्यांवर आलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करतो. या विषयावर उद्यपाल महाराजांचे किर्तन पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शंकर बोढे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन एकनाथ गोखरे तर उपस्थिताच आभार सतिश बोढे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात
By admin | Published: March 26, 2017 12:35 AM