प्रवीण खिरटकर वरोरा तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य पदाच्या पाच जागा होत्या. त्यात भाजपा दोन, इंदिरा काँग्रेस दोन तर एक जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जि.प. ची एकही जागेवर वर्चस्व सिध्द करता आले नाही.खांबाडा-चिकणी गटातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव व जि.प. च्या माजी सभापती आसावरी देवतळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती मत्ते यांचा ७४३ मतांनी पराभव केला. आसावरी देवतळे यांना ३९७७ तर ज्योती मत्ते यांना ३२३४ मते मिळाली. टेमुर्डा - आबमक्ता गटातून भाजपाचे बंडखोर उमेदवार राजु गायकवाड यांनी भाजपाचे उमेदवार ओमप्रकाश मांडवकर यांचा १३४७ मतांनी पराभव केला. राजु गायकवाड यांना ४४२१ तर ओम मांडवकर यांना ३०७४ मते मिळाली. नागरी - माढेळी गटातून भाजपाच्या विद्या किन्नाके यांनी शिवसेनेच्या सविता गेडाम यांचा १७८८ मतांनी पराभव केला. विद्या किन्नाके यांना ५३५३ तर सविता गेडाम यांना ३५६५ मते मिळाली. चरूर खटी सालोरी गटात इंदिरा काँग्रेसच्या सुनंदा जीवतोडे यांनी शिवसेनेच्या वंदना ठेंगळे यांचा ८२ मतांनी पराभव केला. सुनंदा जीवतोडे यांना ४६७१ तर वंदना ढेंगळे यांना ३८४५ मते मिळाली. शेगाव बोर्डा गटात भाजपाच्या ज्योती वाकडे यांनी शिवसेनेच्या शोभा भरडे यांचा २००८ मतांनी पराभव केला. ज्योती वाकडे यांना ५२११ तर शोभा भरडे यांना ३२०३ मते मिळाली.
वरोऱ्यात भाजप-सेनेचा मुकाबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 1:22 AM