प्रकाश देवतळे : केंद्र सरकारचा कार्यकाळ अपेक्षाभंगाचालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ होता. मोदींची अच्छे दिनची घोषणा हीमृगजळाप्रमाणे फसवी होती हे आता स्पष्ट झाले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाल पाने पुसली आहेत, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणांच्या जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शून्य आहे. गेली तीन वर्षे मोदी यांनी मनमोहनसिंग सरकारने सुरु केलेल्या कामांची उद्घाटने केली आहेत. त्यांनी घोषणा केलेला एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भ्रष्टाचाराने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण सपशेल अपयशी ठरले आहे. शेजारी देश रोज कुरापती काढत आहेत. दलित- आदिवासी, अल्पसंख्याकावरील हल्ल्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली गरीब दलित, अल्पसंख्यांकाचे मुडदे पाडले जात आहेत. देशात झुंडशाही आली आहे असा आरोप देवतळे यांनी केला आहे. देवतळे म्हणतात की, देशाच्या विविध भागात दलित आदिवासीवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यप्रदेशात ५० दलित कुटुंबानी इच्छामरणाची मागणी केली आहे. मध्यप्रदेशात ५० दलित कुटुंबांनी इच्छामरणाचीमागणी केली आहे. पंतप्रधान आदिवासी विकास दिवसाचे पोस्टर काढतात. जाहिराती करतात. पण आदिवासींसाठीच्या योजनेत सुरु असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत काही बोलत नाहीत. या सरकारने आदिवासींच्या विकास योजनांवरील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. देशात गोरक्षकांच्या नावाखाली गुंडगिरी सुरु आहे. पंतप्रधान म्हणतात पण त्याला आवार घालण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात नाही. हे त्यांच्या तीन वर्षाच्या काळात वारंवार दिसून आले आहे. एकीकडे पंतप्रधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच गुजरात येथील उमा मध्ये गोरक्षक दलितांवर अनन्वित अत्याचार करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरभरुन बोलणारे पंतप्रधान, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचाराबाबत चकार शब्द काढत नाहीत. त्यांच्या मूकसंमतीनेच हे सर्व चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.नक्षली, दहशतवादी हल्ले सुरुचनोटबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधानांनी सांगितले होते की, नोटाबंदीनंतर दहशतवादी आणि नक्षली हल्ले बंद होतील. पण गेल्या काही दिवसांत नोटाबंदीनंतर हल्ले कमी झाल्याचे दिसत नाही. उलट ते हल्ले वाढले आहेत. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये १७५ पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र नोटबंदीतून किती काळा पैसा बाहेर आला, हे पंतप्रधान आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अद्यापही सांगू शकले नाहीत.गांधीजींचे विचार अमरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आरक्षण संपविले पाहिजे, असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला फक्त आरक्षणच नाही. तर आरक्षणाचा लाभ ज्यांना मिळतो त्या दलित आदिवासी मागासवर्गीय यांना संपवायचे आहे. असेच यांच्या तीन वर्षांच्या कारभारावरुन दिसत आहे. पंतप्रधान तर खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडवरील महात्मा गांधीच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापून गांधीजींची जागा घेण्याचा प्रयत्न करु लागले आहे. नरेंद्र मोदी यांनी कॅलेंडरवरुन महात्मा गांधीचा फोटो हटवला. पण गांधीजींचे विचार तुम्ही हटवू शकरणार नाही, असा इशाराही देवतळे यांनी दिला आहे
भाजपने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By admin | Published: June 05, 2017 12:28 AM