३४ हजार कोटींची कर्जमुक्ती : शासनाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली ३४ हजार कोटींची कर्जमुक्ती ही ऐतिहासिक असून देशात प्रथमच एवढया मोठया रकमेची कर्जमुक्ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करणारा जगाचा पोशींदा बळीराजा या मदतीने सुखावला असून भाजपाच्या नेतृत्वातील हे रयतेचे सरकार यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार, अशा भावना व्यक्त करीत भाजप कार्यकर्त्यांनी येथील कस्तुरबा चौकात या निर्णयाचे स्वागत करीत रविवारी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, भाजपा नेते प्रमोद कडू, तुषार सोम, रामपाल सिंह, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, चंद्रपूर तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, राजेंद्र अडपेवार, नगरसेवक देवानंद वाढई, रवी गुरनुले, सोपान वायकर, नगरसेविका आशा आबोजवार, माया उईके, नगरसेवक संजय कंचर्लावार, चंद्रकला सोयाम, धनंजय हुड, ज्योती भुते, रमेश भुते, रवी आसवानी, श्याम कनकम, सविता कांबळे, वंदना तिखे, मोनू चौधरी, राजेंद्र खांडेकर, राजू घरोटे, निलेश बेडेकर, अनिल डोंगरे, कल्पना बगुलकर, सुर्यकांत कुचनवार, रवी जोगी, प्रविण चवरे, संतोष वडपल्लीवार, विनोद शेरकी, संतोषकुमार द्विवेदी, छबु वैरागडे, अनिल खनके, अरविंद चवरे, छाया खारकर, सुनिल पाटील, श्रीनिवास मेकल, फारूख शेख, अनिल येलमुले, जुम्मन रिजवी, आमीन शेख आदींसह अनेक कार्यकर्ते व नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कस्तुरबा चौकात भाजपाचा आनंदोत्सव
By admin | Published: June 26, 2017 12:33 AM