शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM

वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

ठळक मुद्देवरोरा व चंद्रपूर अड्डा : कारवाया केवळ नाममात्रच

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील पान व खर्रा दुकाने एकाएकी बंद करण्यात आली. मात्र शौकिणांना खर्रा मिळणे बंद झाले नाही. मग खर्रा बनविण्यासाठी हा सुगंधित तंबाखू येतो कुठून? असा सवाल प्रत्येकांना पडला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.जिल्हा प्रशासनाने शहरातील जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडण्याला परवानगी दिली आहे. सुंगधित तंबाखू व त्यापासून बनविलेला खर्रा हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत नाही. शिवाय एखाद्या कोरोनाबाधिताने खर्रा खावून थुंकल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. गंभीर बाब म्हणजे खर्रा विकणारा हा दररोज शेकडो खर्रा शौकिनांच्या संपर्कात येत आहे. अशातच त्याला एखाद्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यास सध्या आटोक्यात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा पडला तर नवल वाटू नये, अशी स्थिती आहे. खर्रा विक्रेत्यांना छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखू मिळत असल्यामुळेच तो खर्रा विक्री करीत आहे. हा सुगंधित तंबाखू कुठून मिळतो, याची माहिती त्यावर कारवाई करणाºया विभागालाच चांगली माहिती आहे. मग तरीही सुगंधित तंबाखू विकला जात असल्याचे चित्र आहे. हा विभाग हे सगळे डोळे मिटून बघतो आहे. याचे रहस्य न समजण्यासारखे नाहीच.दरातील वाढ कुणाच्या पथ्यावरही दरवाढ सुगंधित तंबाखूचा काळाबाजार असाच बिनदिक्कत सुरू राहण्यासाठी आकारला जात असल्याचे समजते. बाजारात तीन ते चार प्रकारचा सुगंधित तंबाखू येत आहे. २०० ग्रॅमच्या एका नामांकित कंपनीच्या डब्यावर ७५० रुपये दर अंकीत असताना तो काळ्या बाजारात २४०० ते २५०० रुपयाने विकला जात असल्याचे काही छुप्या मार्गाने खर्रा विकणाऱ्यांचे म्हणणे आहे.असा मिळतो खर्राखर्रा विक्रेते घरीच खर्रा बनवितो. तो एका पिशवीत घेऊन नेहमी ठरलेल्या परिसरात उभा राहून आपले ग्राहक हेरत असतो. काहींनी आपल्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांकही सहज सुविधेसाठी दिलेला आहे. तो तिथे दिसला नाही तर फोन करून अपडेट घेतो आणि खर्रा मिळण्याची वेळ निश्चित केली जाते. कारवाई करणारेही यांचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहे.तंबाखूवर कोट्यवधींची उलाढालचंद्रपूर जिल्ह्यातील खर्रा विक्रेत्यांकडून सुगंधित तंबाखूची मागणी एकाएकी वाढल्यामुळे सुगंधित तंबाखूचा दर अव्वाच्या सव्वा झाला आहे. यामुळे खर्ऱ्याचा दर वाढवावा लागला असल्याचे खर्रा विक्रेते आपल्या शौकिन ग्राहकांना खासगीत सांगत आहे. लॉकडाऊननंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या छुप्या मार्गाने सुरू असलेल्या व्यवसायात झाल्याचे जाणकार सूत्राचे म्हणणे आहे.

सुगंधित तंबाखूची तीनपट भावाने विक्रीसुगंधित तंबाखूवर बंदी घातल्यानंतर खर्रा विक्री राजरोसपणे सुरूच होती. तरीही तंबाखूचा दर डब्यावर असलेल्या दरापेक्षा अधिक वसूल करीत होते. आता या बंदीची अंमलबजावणी कडक केल्यामुळे सुगंधित तंबाखू होलसेलमध्ये विकणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल तीनपट दराने ही विक्री बिनदिक्कत सुरू असल्याची सूत्राची माहिती आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी