वरोरा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आनंदवन चौकातील वाहतूक काही वेळासाठी बंद पाडली.
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यानंतर लगेच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत घेत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर टेंमुर्डे, विलास नेरकर, बंडू डाखरे, नगरसेवक प्रदीप बुराण, दिनेश मोहारे, तालुकाध्यक्ष विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, हसन दोसानी, बंडू खारकर, चंद्रकांत कुंभारे, राजू वरर्घने, बंडू भोगाडे, अतुल वानखेडे, दिलीप महल्ले, रंजना पारशिवे, सुशीला तेलमोरे, दिलीप खैरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.