शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

रस्ते रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टाकीपर्यंत दुहेरी मार्गाचेही खोदकाम केल्या जात आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : चौपदरीकरणानंतरही खांब रस्त्याच्या मध्यभागी

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते वरोरा नाका या वर्दळीच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, या मार्गावरील वीज खांब बाजुला न केल्याने रस्ता रुंदीकरणात या खांबाचा अडथळा निर्माण झाला आहे.वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टाकीपर्यंत दुहेरी मार्गाचेही खोदकाम केल्या जात आहे. चंद्रपुरातून नागपूरकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. याच मार्गाच्या दोन्ही बाजुला अनेक व्यावसायिक वाहने उभी केली जातात. काळाची गरज म्हणून या महत्त्वपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हा निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु, मार्गाच्या दोनही बाजुचे वीज खांब जैसे-थे आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे वीज खांब मध्यभागी येतात. खांब हटविले नाही तर नागरिक व वाहनधारकांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे धोकादायक खांब बाजुला हटविण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.रस्त्याच्या कडेला टाकले पाईपवीज खांब हटविण्याबाबत काहीच हालचाली नसल्याचे पाहून बांधकाम कंपनीकडून पर्याय म्हणून मार्गाच्या कडेला पाईप टाकून बांधकाम केल्या जात आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीला या पाईपमधून भूमिगत तारा टाकता येऊ शकतात.जनहितासाठी काढावा तात्काळ पर्यायचंद्रपूर शहरातील वर्दळीच्या मार्गांचे रूंदीकरण व चौपदीकरण केल्यानंतरही वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी राहत असतील तर या मार्गांना काहीच अर्थ उरत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनाधारकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेऊनही लोकांचे जीव वाचावेत, यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.वीज वितरण कंपनीकडे ८० लाख डिपॉझिटसदर रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी वीज खांब हटविण्यासाठी वीज वितरण कंपनीने १५५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. दरम्यान, यापैकी अर्धा टप्पा म्हणून ८० लाखांची रक्कम वीज वितरण कंपनीकडे भरणा करण्यात आला आहे.बांधकाम विभागाची विनंती फेटाळलीसार्वजनिक बांधकाम विभागाने सदर वीज खांब हटविण्याची विनंती एका पत्राद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली होती. परंतु, पूर्ण रक्कम भरल्याशिवाय निविदा काढता येणार नाही, असा नियम असल्याचे कळवून वीज कंपनीने खांब हटविण्याची कार्यवाही प्रलंबित ठेवल्याची माहिती आहे.चंद्रपूर मनपाअंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण सुरू आहे. बांधकाम करताना विजेचे खांब अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे हे खांब अन्यत्र शिफ्ट करण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आला. बांधकाम विभागाकडून ही कामे होत आहेत. मनपाने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, विजेचे खांब हटविण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला. वीज वितरण कंपनीकडे डिपॉझिटही भरण्यात आले. नागरिकांसाठी रस्ता सुखकर व्हावा, यासाठी मनपाकडून सहकार्य केल्या जात आहे. हा प्रश्न निश्चितपणे सुटेल.- संजय काकडे, आयुक्त मनपा, चंद्रपूरमार्गावरील वीज खांब बाजुला करण्याचा अंदाजपत्रक १५५ लाखांचा मंजूर झाला होता हे खरे आहे. त्यापैकी पार्ट पेमेंट ८० लाख रूपये वीज वितरण कंपनीकडे भरण्यात आले. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दरम्यान, कालमर्यादेनुसार हे अंदाजपत्रक नव्याने रिव्हाईज्ड झाले. नवीन अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्याचे आजच वरिष्ठांकडून पत्र मिळाले. त्यानुसार आता हे अंदाजपत्रक १५५ वरून १७१ कोटींवर गेले आहे. डिपॉझिट भरल्यानंतर पुढची कार्यवाही होईल.- अविनाश कुºहेकर, कार्यकारी अभियंता,वीज वितरण, चंद्रपूरवीज वितरण कंपनीकडे बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या निधीनुसार डिपॉझिट भरण्यात आले आहे. या घटनेला सात- आठ महिने झाले. सदर रक्कम भरून हमीदेखील घेण्यात आली. त्यामुळे पुढील कार्यवाही होणे अपेक्षित होते.- संतोष जाधव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, चंद्रपूर 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकelectricityवीज