चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची अधिक गरज आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज ३० ते ४० बॅगची गरज आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, सिकलसेल, रक्तक्षय, थैलिसिमिया, शस्त्रक्रिया, प्रसूती या रुग्णांनाही रक्त द्यावे लागते. अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या रक्तपेढीवर भार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्यांना रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढावा यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे.
बाॅक्स
१० ते ४ पर्यंत करू शकता रक्तदान
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील रक्तपेढीमध्ये १० ते ४ वाजेपर्यंत रक्तदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही येथे येऊन रक्तदान करता येते. रक्तदानामुळे दुसऱ्या एखाद्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे स्वमर्जीने येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
कोट
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येही सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत येऊन रक्तदान करता येते. मनात गैरसमज न ठेवता सर्वांनी रक्तदान करावे
-डाॅ. अनंत हजारे
रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर
बाॅक्स
लस घेण्यापूर्वी रक्तदान करा
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबिवली जात आहे. त्यामुळे रक्तदानावरही याचा परिणाम होत आहे. नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उहाय म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे हाच पर्याय आहे.