शिबिराचे उदघाटन माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी लोकमतच्या कार्याचे कौतुक केले. माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे पुण्याचे काम लोकमत करीत आहे. कठीण कोरोनाच्या काळात रक्त हे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, ॲड. अरुण धोटे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. लहू कुळमेथे, प्राचार्य एस. एम. वरकड, सतीश धोटे, डॉ. ए. डी. अरके, डॉ. ए. पी. डाहुले, डॉ. एस. डी. जाधव, वि. ए. डाखोले, जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, रिता पाटील, ए. के सेलोटे, सुषमा शुक्ला, पी. ए. उराडे, हरिभाऊ डोर्लीकर, स्वरूपा झंवर, शुभांगी वाटेकर, बादल बेले, गुरुदास बलकी, अविनाश दोरखंडे, संदीप खोके, माजी नगरसेवक गजेंद्र झंवर, आशीष यामनूवार, अशोक राव, रक्त पेढीचे संजय गावित, अमोल जिड्डेवार, जय पचारे, योगेश जरोडे, सुहास भिसे, रूपेश घुमे, लक्ष्मण नगराळे, चेतन विरागडे, साहिल भासारकर उपस्थित होते. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. आभार प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी मानले.
050721\img_20210705_104547.jpg
रक्तदान शिबीर